का कोणास ठाऊक… | मराठी कविता | सांझ कवी…

Posted on

का कोणास ठाऊक,
आज मन विचारात पडलय….
का कोणास ठाऊक,
अयुष्यात वेगळच घडतय…
डोळ्यात स्वप्न मनात ध्यास घेऊन येणार मन,
आज पुन्हा भरकटलय….
हजारो संकटांवर मात करनार मन,
आशेच्या पंखांखाली गुरफटलय…
आठवून आकांत सारा
आज मनसोक्त रडलंय…
का कोणास ठाऊक,
आज मन विचारात पडलय…
शब्दांची जाणीव नसणार मन
शब्दांच्याच कोड्यात अडखळलय…
कधी संपेल हा आयुष्याचा प्रवास,
आज स्वताशीच बडबडलय…
देऊन रंग स्वप्नांना,
पुन्हा चालू लागलय…
का कोणास ठाऊक,
आज मन विचारात पडलय…
का कोणास ठाऊक…!!

-सांझ कवी…✍🏻

Leave a Reply