‘तुझ्या परत येण्याने’ | मराठी कविता

तुझ्या परत येण्याने
तुझ्या परत येण्याने मी झाले पूर्ण
आता नको राहू आपली कहाणी अपूर्ण
घे ना तुझ्या हातात हात माझा
नको देऊ कोणाच्या हातात हात तुझा
हे जग तुझ्यासाथीने सजवायचे
पाहिलेले स्वप्न मी आता पूर्ण करायचे
होशील का माझा तू साजना
तूच आहे फक्त माझ्या मना
तुझे शब्द मला मोहरुन टाकतात
माझ्या मनात तूझे बोल असतात
आता तू माझ्या जवळ नसे
तर तु मनातुन जवळ भासे
साथ जन्माची साथ आपली
हाथ सोडू नको कधी
हरवून जायच आपल्या
संसाराच्या प्रेमामधी
✍️Wr.Pallavi ✍️
सौ पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी, कोल्हापूर

Leave a comment