बेस्ट 11+ आजीसाठी मराठी कविता | Poems for grandmother in marathi

बेस्ट 11+ आजीसाठी मराठी कविता संग्रह

नमस्कार मित्रांनो,

आज मी घेऊन आलोय खास आजी साठी काही मस्त अश्या कविता ज्या ऐकून तुमच्या डोळ्यात पानी आल्या शिवाय राहणार नाही. आजी ही सगळ्यांच्या जवळ असते तिचे ते मायेने आपल्या चेहऱ्यावर हात फिरवणे आणि आपल्याला साठऊन ठेवलेले 10 चे नाणे किंवा नोट हातात देणे हे मन भरून आणते.

अश्याच काही कविता काही खास लेखकांनी लिहल्या होत्या त्या मि एका जागेवर आणण्याचा प्रयत्न केला आहे पण काही कवितांच्या लेखकांची नावे कळू शकली नाहीत जर तुम्हाला काही कल्पना असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. या कविता खूप साऱ्या वेबसाइट वरुण घेतल्या असल्याने यात काही साम्य असू शकते किंवा काही त्रुटि असू शकतात तर या साठी आम्हाला क्षमा करावे.

आजी माझी जशी चंद्रकोर

आजी माझी जशी चंद्रकोर
जगण्याचा तिचा अनुभव थोर

कपाळावर तीच्या आठी
शिकवितात जीवनातील
आडकाठींच्या गाठीभेठी

तशी धडधाकट आहे माझी आजी
बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी

आजीच आमचा पाया
आणि आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया

आजी म्हणजे काय..??

आजी म्हणजे काय 
दुधावरची साय..!!
आजी म्हणजे काय
प्रेमाची माय..!!

आजी म्हणजे काय
आईची माझ्या माय..!!
आजी म्हणजे काय
नातवंडांची लाडकी आय..!!

आजी म्हणजे काय
आयुष्य भर जपलेली गोड बाय..!!
आजी म्हणजे काय
माझ्या बालपणीच्या मोठेपणाची सोबती हाय..!!

आजी म्हणजे काय
आशीर्वाद देणारी माऊली हाय..!!
आजी म्हणजे काय
सगळ्यांचा खंबीर साथ हाय..!!

आजी म्हणजे काय
दहा हत्तीचं बळ जणू बळ हाय..!!
आजी म्हणजे काय
प्रत्येकाला लाभलेलं भाग्य हाय..!!



-Bhagyashri Chavan Patil

मऊशार माया

आजीच्या थरथरणाऱ्या हातांची
मऊशार माया
मला वाटते हवीहवीशी
मनात साठवाया

आजीच्या मांडीवर डोके ठेऊन
आकाशतल्या चांदन्या मोजव्यात
आजीने सांगितलेल्या कथेत
स्वतःचा एक नवीन शोध लागावा

तिचा पदर धरून
मग मागे-मागे फिरावे
बाबांकडून हट्ट पुरवण्यासाठी
आजीला लाडीगुडी लावावे

आजी तुझ्या हातांची चव
या संपूर्ण जगात कुठेच नाही
आणि तू घास भरवल्याशिवाय
आजी माझी भूक संपत नाही

तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया
आजी नको सोडूस मला कधी
कारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला
पूर्णत्व येणार नाही

माझी आजी

माझी आजी आहे गुरू
साऱ्या घराचा ती पाया
आम्हा सगळ्यांवरती
तिची असायची माया ।।

आजी फारच मयाळू
प्रेम करी आम्हावर
खाऊ करते खायाला
सारे रानी गेल्यावर ।।

आई वडील रानात
आजी सांभाळी घराला
घरकाम सावरुन
चारा घाली वासराला ।।

माझी आजी घाली रोज
नित्य तुळशीला पाणी
करी काकडा भजन
जरी असेल आडाणी ।।

आजी म्हणे हरिपाठ
सारी मुले जमवून
मुले खेळता पावली
आजी जायची दमून ।।

माझी आजी गुणवान
गोष्टी सांगे छान छान
गाते रोजच अंगाईनसे
कधी मान पान ।।

हात पाय थकलेले
काठी आजीचा आधार
आजी सांभाळते सारा
घरीदारी कारभार ।।

आजी बोले खरं खरं|
खोटे कधीही चालेना
सांगे रामायण कथा
नातू आजीला सोडेना ।।

-Vijay sanap

“आजी”


तिचा सुरकुतलेला हात, तिच सुकलं मनगट,
तिच्या दमल्या जीवात, कढ मायेचा तो दाट!

सर सोसली ढगांची, कळ सोसली उन्हाची,
भोवताली तिच्या मात्र दु:ख राहिलं दमटं…!

कधी लेकराची माया, कधी नातवाचा थाट,
मिळाली मात्र नाही तिला कोणाची संगत..!

दिवसाची रात्र झाली,अंधारला आसमंत,
तिने तेवला तो दिवा, तिच्या भाबड्या मनात…!

लढा तिचा एकटीचा, तिने लढला घरात,
तिच्या धैर्याची ती गाथा , माझ्या अस्पष्ट आठवांत….!

Source :- http://mahakatta.com/newsfeed/10612

गोधडीतील ऊब सांगते

दोन रंगाच्या आजीने शिवलेल्या
गोधडीतील ऊब सांगते
आयुष्यभर सोबत फक्त आठवणींचीच
कारण आजी थोडी आयुष्यभर पुरते

अशिक्षित

माझी “अशिक्षित” आजी म्हणायची
मेंदूला कुलूप लावून चावी गटारीत फेकलेल्या
“अडाणी लोकांच्या” नादी लागून
त्यांना कधी समजवत नाही बसायचे
कारण त्यात आपलाच वेळ जातो
पण आता समाजातील so called “प्रतिष्ठित हुशार”
लोकांनीच जुन्या बुरसटलेल्या
किंवा एक विशिष्ट विचार मेंदूत ठेऊन
मेंदूची चावी फेकून दिलेली दिसते
तर त्या “प्रतिष्ठित हुशार” असलेल्या लोकांचे काय करायचे
हे काय आजीने सांगितलेच नाही बुवा ?

आजी म्हणली होती

त्याला पाहिले अन् माझी नजर खिळली होती
तुला देखणा नवरा मिळेल असं आजी म्हणली होती

रमताना संसारात घरी जाणे विसरून जाते हल्ली
माहेरी परतायची नाहीस तू असं आजी म्हणली होती

घरातली काडी पण मर्जीविना माझ्या हलत नाही
सासरी राज्य करशील असं आजी म्हणली होती

दोघांच जगने अन् आनंदाचा संसार करशील
नांदा सौख्यभरे असं आजी म्हणली होती

माझ्याच आयुष्याला दृष्ट लागेल माझी
नक्की कोणत्या मुहूर्तावर सुखी राहा आजी म्हणली होती

मन हे ओथंबून आले

मन हे ओथंबून आले
मनात आजी तुझेच चित्र दिसले

आजी तू कोरून गेली छाप प्रितीची
माया दिलीस तू मला मातृत्वाची

आजी लाभली प्रेमळ दिलाची
निरंतर सुख असावे आजी तुझ्याच साठी

आजी तु नसल्याने

माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेल्या घरात
आता नाही वाट बघणारी माझी आजी
मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवायला
आता नाही माझी आजी

लिहायला जमलेच नाही तू असताना
लिहिल्या कविता आजी तुझ्यासाठी
कारण शब्द सुद्धा कमी पडायचे
आजी तुझे प्रेम व्यक्त करताना


आजी तु नसल्याने पोकळ वाटतेय माझे आयुष्य
काही कळेनासे झाले आहे की कसे राहील माझे भविष्य

आईची माया देणारी आजी

खूप भाग्यवान लोकांना मिळते आईची साथ
परंतु मी इतका भाग्यवान नाही
कारण मी आईपासून कधीच दुरावलो आहे
पण माझे भाग्य आहे की
मला आईची माया देणारी आजी मिळाली

मित्रांनो तुम्हाला वरील कविता कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा म्हणजे आम्हाला काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, तसेच जर का तुम्ही आम्हाला काही कविता किंवा लेख पाठाऊ इच्छित असाल तर आम्हाला नक्की कळवा किंवा आम्हाला ईमेल द्वारे पाठऊ शकता.

तुम्ही आम्हाला marathicharoli.in@gmail.com या ईमेल वर कविता पाठऊ शकता.

2 thoughts on “बेस्ट 11+ आजीसाठी मराठी कविता | Poems for grandmother in marathi”

Leave a comment