“पेपर व मन” मराठी कविता -ADITYA ZINAGE

पेपर व मनं

एक कागदाचं पान असतं…!!
‘श्री’ लिहलं, की पूजले जाते….
प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं…
काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं….
एक कागदाचं पान असतं…!!

कधी त्याला विमान, होडी बनवून खेळलं जातं….
आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जाते……
एक कागदाचं पान असतं…..!!

जे लेखकाच्या लेखणीला आकार देत……
जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं……
आणि हो, वकीलासोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं……
एक कागदाचं पान असतं……!!

ज्यावर बातम्या छापल्या की वर्तमानपत्र बनते…..
प्रश्न छापले, की प्रश्नपत्रिका बनते…..
विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं…..
एक कागदाचं पान असतं……!!

पेपरवेट ठेवलं, की एकदम गप्प बसतं…
काढून घेतलं, की स्वच्छंदी फिरतं आणि
कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं….
एक कागदाचं पान असते……!!

माणसाच्या जीवनांत आणि
त्यात खूप साम्य असतं…!!
आपल्या मनाचं पण असतं….!!

कधी मानसाला एकटं वाटू लागलं
तर ते मन आपलं सोबती होतं….
जर कुणाच्याही विचारांत गुंतले
की त्याचंच होवून जातं….
आपलं मनाचं पण असंच असतं….!!

दुःखच ओझं मनावर वाढलं, की एकदम उदास होतं
दुःख जर व्यक्त केलं की आनंदाने जगू लागतं
म्हणून मनातील गोष्टी बोलून व्यक्त व्हावं
आयुष्य खुप सुंदर होतं …

-ADITYA ZINAGE

Leave a Comment

Scroll to Top