Top 51+ मराठी प्रेमावरच्या चारोळ्या, कविता

Posted on

आमचा प्रेम कवितांचा संग्रह प्रेमाची गहन भावना कॅप्चर करतो. या कविता रोमँटिक प्रेमाच्या खोलात खोलवर जातात, त्याच्या अनेक पैलूंचा शोध घेतात – आनंद, वेदना, तळमळ आणि त्यातून मिळणारी पूर्तता. प्रत्येक कविता प्रेमाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे, आपल्या हृदयाला स्पर्श करण्याची आणि आपले जीवन बदलण्याची क्षमता प्रतिबिंबित करते. तुम्ही उत्कट प्रणय, तुटलेल्या हृदयाची काळजी घेत असाल किंवा फक्त प्रेमाच्या संकल्पनेत रमत असाल, आमचा संग्रह प्रत्येकासाठी काहीतरी ऑफर करतो. या श्लोकांमध्ये स्वतःला मग्न करा आणि त्यांना तुमच्या हृदयाशी बोलू द्या. कवितेच्या कलेतून व्यक्त झालेल्या प्रेमाचे सौंदर्य अनुभवा.

❤️Marathi प्रेमावर kavita❤️

चारोळी

कळेच ना कधी कधी कशास नाव काय ते
अबोल राहिल्यावारी असेच हेच व्हायचे….
शब्द राहता मुकेच मौन सांगे काय ते
मौन ना कळेल तर हेच असेच व्हायचे…..

प्रेम म्हणजे विश्वास….❤️
प्रेम म्हणजे काळजी….❤️
प्रेम म्हणजे दोन जीव येक प्राण..❤️

Also Read : Birthday Wishes For Girlfriend In Marathi 

तूझ्या ओठांची तुलना

तुझ्या ओठांची तुलना करताच
गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात
बोटे मोडून कडा-कडा डोक्यावर
चटकन गालावर काळा तीळ लावतात.
 #प्रेम चारोळ्या

प्रिये…

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,

माझा श्वास तुच आहेस…

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..

डोळे लावुन भिजुन जा..

माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस

आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

तू सोबत नसताना…

कोकिळेचा मधुर आवाज सुद्धा कर्कश वाटतो.

वेलीवरची सुंदर फुले सुद्धा काटेरी भासतात.

तू सोबत नसताना… बहरलेला श्रावण ऋतु सुद्धा उजाड वाटतो.

मनी दु:खाचे ढग दाटून येतात आणि अश्रूंचा पाऊस पडू लागतो.

तू सोबत नसताना… अमृताचे प्याले सुद्धा कडवट लागतात.

लख्ख प्रकाशात सुद्धा जीवन अंधारमय वाटते आहे.

तू सोबत नसताना… आयुष्यातील क्षण सुद्धा युगा सारखे वाटतात.

आठवण येताच तुझी आजही नयनी अश्रु दाटतात.

तुला नाही माहीत…

आठवण येताच तुझी मी मध्यरात्री अचानक दचकून उठायचो.

मोबाइल मधील तुझा फोटो पाहून स्वत:च्या मनाला सावरायचो.

तुला नाही माहीत…

तुला नाही माहीत की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे.

तुझ्या पासून दूर आलोय कारण तुला जिंकलेल पाहन्यासाठी मी रोज हरतो आहे.

तुला नाही माहीत…

लांब असेल की प्रेम वाढते म्हणून तू दूर राहतेस तुझ्या

अलगत जवळ आल्यावर तू रागाने का पाहतेस…

#marathi prem charolya, कुसुमाग्रज प्रेम कविता

हसत नाही

आजकाल माझ्याकडे पाहून तू

पहिल्यासारखी हसत नाही सध्या

तूझी मीठी ही मला घट्ट अशी बसत नाही……

                 #marathi prem kavita charolya

तुझी खोडी

तुझा हिरमुसलेला चेहरा

मला खरच पाहवत नाही

तूझी खोडी काढून

हसविल्या शिवाय मला

अगदी राहवत नाही…

               #prem charolya,मराठी कविता प्रेमाच्या आठवणी

अश्रू

आपल्या डोळ्यांतील अश्रू

आपणच पुसायचे असतात

मदतीचे हात देणारे नेहमी

स्वार्थ का शोधत असतात? 

                          # प्रेम कविता sms

🍁🍁🍁🍁🍁

भेट पहिली

विसरणार न कधीही 

भेट पहिली दोघांची…

 एकाच त्या दृष्टीत

 पेटली ज्योत प्रीतीची…

पाहुनी तुझे नेत्र 

हसरे मन माझे मोहवले…

अन तुझ्या मिलनास्तव 

हृदय माझे ओढावले…

पहिल्या वहिल्या त्या भेटी 

ओठांवर न शब्द आले…

निःशब्द नेत्रांनी परंतु 

अंतरीचे भाव कथिले….

            #प्रेम कविता चारोळ्या

🍁🍁🍁🍁🍁

सांग सखे

सांग सखे गुलाबासारखी जीवनात येशील कधी…

काट्याप्रमाणे टोचत राहशील कधी…

सांग सखे साखरेची गोडी

पण मधुमेहाची भीती देशील कधी…

 सांग सखे दिव्यासारखे जळत राहून

 माझ्या जीवनात प्रकाश देशील कधी…..

           #marathi charoli

🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य भर हसवेन

आयुष्यभर हसवेन तुला 

पण मला कधी रडवून जाऊ नकोस, 

काळजी घेईन तुझी 

पण मला कधी सोडून जाऊ नकोस …

🍁🍁🍁🍁🍁एकतर्फी प्रेम कविता🍁🍁🍁🍁🍁

Style मारणारी

Style मारणारी मुलगी 

काही क्षणासाठी आकर्षित करू शकते.. 

पण मुलाला खऱ्या प्रेमात फक्त 

Simple वाली मुलगीच पाडू शकते….

🍁🍁🍁🍁🍁

मी श्याम रंग

मी शाम-रंग माझा, तू पुष्पगुच्छ साजा

बिलगून गंध दे मज, इतके च शब्द साधे

डोळ्यात बोचते मज, माझेच रूप आधे

वाटे तुला ना काही, श्रीकृष्ण वाट पाही

 गोपी असूच दे मग, रुसवा कशास मागे 

डोळ्यात बोचुदे मज, माझेच रूप आधे…

           🍁🍁🍁🍁🍁

एक गुपित

पाण्यात आणि प्रेमात

 माणसाने नेहमीच पडावं

पण एक गुपित माञ 

आपण लक्षात घ्यावं…

 इतक खोल जाऊ नये की,

 वर येणं कठिण होईल

 इतक वरही राहू नये की, 

मजा घेणं अशक्य होईल.

पाण्याच्या आणि प्रेमाच्या 

बाबतीत समतोल 

राखला तर सारं 

काही छान असत…

🍁🍁🍁🍁🍁

चारोळ्या

चमकणाऱ्या काजव्यांना

रात्रीचा अंधार घालवता येत नाही

आणि त्या रात्रीला देखील

काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही

रातराणीचं आयुष्य म्हणतात

एका रात्रीचं असतं

एका रात्रीचं असल तरी

मोठ्या खात्रीचं असतं

इथे प्रत्येकाला वाटते

आपण किती शहाणे

यावर उपाय एकच

सर्व शांतपणे पाहणे

इथे प्रत्येकाला

प्रत्येकाचा भूतकाळ आहे

मला जगानं खूप छळलं

हा प्रत्येकाचा आळ आहे

जमिनच हरवली तर

मुळांनी कुंज्यायाच ?

ज्यांचा जीवावर फुलायचं

ते पाणी कोठून आणायचं

जमिनीतले पाणी मिळते

मूळ तेव्हा रुजते

निष्पर्ण झाडावर प्रेम बसरते

तेव्हा त्यालाही पालवी फुटते

🍁🍁🍁🍁🍁

कुणीतरी आपल्यासाठी…..

का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते

कुणीतरी आपल्यासाठी असावे

ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे

आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे

रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे

मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे

उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे

पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे

केव्हा नटता सावरता आपण

त्याने मनापासुन कौतुक करावे

का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..

कुणीतरी आपल्यासाठी असावे…

                                                  …नागेश पाटील 

🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाचा अर्थ

सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा 

चेहरा पाहण्याची इच्छा होते ….ते प्रेम आहे 

मंदिरा मध्ये दर्शन करताना जी 

जवळ असल्याचा भास होतो …ते प्रेम आहे

भांडून सुधा जिचा राग येत नाही.. ते प्रेम आहे

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण 

दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते… ते प्रेम आहे

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन

 मोकळे झाल्यासारखे वाटते…ते प्रेम आहे

स्वताला कितीही त्रास झाला तरीही 

जिच्यासाठी ख़ुशी मागता …..ते प्रेम आहे

जिला लाख विसरण्याचा प्रयत्न

करा विसरता येत नाही…. ते प्रेम आहे

कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत

जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते.. ते प्रेम आहे

जिच्या चुकीना रागावतो आणि

 नंतर एकांतात हसू येते ….ते प्रेम आहे

हि पोस्ट वाचताना प्रत्येक

ओळीला जिची आठवण आली… ते प्रेम आहे. 

🍁🍁🍁🍁🍁

जीवनात नाती

जीवनात नाती तशी

अनेकच असतात,

पण ती जपणारी लोक

फार कमीच असतात……|

काही नाती असतात रक्ताची,

तर काही हृदयाची……|

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,

तर काही.. ‘ काही क्षणापुरतीची ‘…….|

काही नाती असतात,

केसांसारखी न तुटणारी,

पण वेळ आलीच तर वाकणारी…..|

काही नाती असतात,

लांबुनच आपले म्हनणारी,

जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी…..|

काही नाती असतात,

पैशाने विकत घेता येणारी,

तर काही प्रेमाने आपलेसे करणारी……|

काही नाती असतात,

न जोडता सुद्धा टिकणारी,

तर काही जोडून सुद्धा तुटणारी………

*****************************

प्रेम ही एक गहन आणि शक्तिशाली भावना आहे जी शब्दात मांडणे कठीण आहे. ही एक सार्वत्रिक भावना आहे जी सीमा आणि भाषांच्या पलीकडे जाते. प्रेम रोमँटिक, प्लॅटोनिक, कौटुंबिक किंवा आत्म-प्रेम असू शकते. हे दुसर्‍या व्यक्तीची किंवा स्वतःची गंभीरपणे काळजी घेणे, दयाळू, समजूतदार आणि संयम बाळगणे आहे. प्रेम अफाट आनंद आणि आनंद आणू शकते परंतु खूप वेदना आणि हृदय वेदना देखील देऊ शकते. त्याच्या गुंतागुंत असूनही, प्रेम हा मानवी अनुभवाचा एक सुंदर भाग आहे जो असंख्य कविता, गाणी आणि कथांना प्रेरणा देतो.

#चार ओळी 

#prem charolya

2 comments

  1. I blog often and I truly thank you for your content. The article has truly peaked my interest. I will bookmark your blog and keep checking for new details about once per week. I subscribed to your Feed as well.

Leave a Reply