तुझ्या वरचे प्रेम कविता | मराठी कविता

Poems मराठी कविता

तुझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगता ही येत नाही…
वेड लागले जिवाला बघून तुला …..
कसं सांगू किती आवडतेस तू मला….

काय करू प्रेमाचा ताज मजला
सजवीता ही येत नाही.
बोलताही येत नाही
आणि लपविता ही येत नाही

जसा मौनाचा पहारा मौनात,
बरेच काही बोलून जातो!
स्पर्श आणि मौन याच,
भावनेने फुलून जातो !

खेळ असा लपाछपीचा.
असाच रंगी रंगुन जातो,
सांज सकाळच्या उन्हात,
अलगद मिसळून जातो !

सावरणे ते चांदणीला.
स्वभाव गगनाचा तो,
हरवल्या तारकेला,
क्षितिजा पल्याड शाधतो

ADITYA ZINAGE

Leave a Reply