“ओली पहाट” मराठी कविता

Posted on

धो धो पावसात

ओली झाली वाट

प्रभाती क्षितिजती

ओली पहाट..1

रविकिरणं ती

लपे त्या नभात

थेंब पावसाचे

धरणी कवेत..2

किलबिल पक्षी

सुमधूर गाणं

दृष्य नयनांना

दिसे छान छान..3

शितल गारवा

वाटे हवा हवा

हृदय छेडी तार

शांत हा पारवा..4

ती साखर झोप

पसरे भूवरी

समस्त सृष्टीत

अंगाई लहरी..5

श्री सुरेश शिर्केखारघर,पनवेल

Leave a Reply