नमस्कार मित्रहो,
आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय आजोबांसाठी काही खास अश्या कविता ज्याकी प्रसिद्ध अश्या लेखकांनी लिहल्या आहेत.

आजोबा म्हणजे आपल्या साठी एक सुपर हेरोच असतोय आणि आपला सगळ्यात पहिला मित्र देखील जो की आपल्या बर वेळ घालवतो आपल्या बरोबर खेळायला येतो, आपल्याला बाबांच्या मारापासून त्यांच्या रागापासून वाचवतो आणि आपल्याला बाळपणाचा पुरेपूर आनंद घ्यायला मदत करतो. अश्या बाबा बद्दल अश्या काही कविता वाचल्यावर तर मन भरूनच येत.
आजोबांबद्दल आपण quotes, आजोबांबद्दल म्हणी ,आजोबांवर कवींता तसेच त्यांचे स्टेटस सर्च करत असतोय तसेच त्यांच्या वाढदिवसाला आपण चांगल caption देखील शोधत असतोय त्यामुळे मि घेऊन आलोय आजोबांवर काही कविता ज्या तुम्ही या सर्व कामासाठी वापरू शकता आणि त्यांना खुश करू शकता
आजोबा
आजोबा आहेत कुटुंबाचा भक्कम पाया 👌
आजोबा आहेत कुटुंबावर निस्वार्थ प्रेमाची माया
आजोबा आहेत नातवंडांच्या अभिमानाची छाया 😇
आजोबा असतात संस्कार आणि संस्कृतीची परिसीमा शिकवण्यासाठी
आजोबा आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी 😊
आजोबा आहेत नातवाचा जिवलग मित्र होण्यासाठी
आजोबा आहेत नातीचा हट्ट आणि लाड पुरवण्यासाठी
आणि ते आहेत कुटुंबाचा अभिमान राखण्यासाठी 🙏
काठी टेकत चालतात आजोबा
पांढऱ्याशुभ्र मिश्यांचा डोले झुबकाडोले डोईवर तोऱ्यात आजोबांच्या फेट्याचा तुरा
जवळ येऊन बोला तुम्ही कमी ऐकू येते जरागोल भिंगाचा चष्मा आजोबांच्या डोळ्यावरी
दातांनी घेतली रजा तरीही हवी पान सुपारीकेसांचाही झाला आजोबांच्या पांढरा शुभ्र रंग
चालताना बघा कसे थरथरते त्याचे अंगगप्पा गोष्टी गाण्यांची असते रोजच मेजवानी
असे वाटते मला ऐकत रहावे आजोबांची प्रेमळ वाणीअंगरख्याच्या खिश्यातून आजोबा हाती देती गंमत
तुमच्याशिवाय आजोबा नाही मला नाही आता करमत
नाते अनमोल जसे
अलगदचं जपलेले सुरकुतलेल्या हाताने
हळूवार स्पर्शलेले ।१।
किती कौतुक,किती प्रेम हे
ह्रदयी माझ्या तरंग उठले
किती निर्मळ तुम्ही आजोबा
मला आपुलेसे वाटले।२।
तुमचे पिकलेले केस अन् मोठ्या मिश्या,
डोळ्यावर गोल चष्मा असलेले
माझ्या लाडक्या आजोबांचे रूप देखणे
ते आरामदायी खुर्चीत बसलेले।३।
सोबत असे काठी पण
सदैव ताठ मानेने चालणारे,
देशसेवेसाठी स्वतःला झोकून देऊन
स्वातंत्र्यसाठी झगडणारे।४।
लहानग्यांचे लाडके अन् मोठ्यांचे मार्गदर्शन करणारे
नेहमी निस्वार्थपणे
दुसऱ्यांना मदत पुरविणारे।५।
नेहमी माझ्यासाठी
गंमत खाऊ आणणारे
रुसलेल्या या ‘सखू’ला
आपल्या विनोदांनी हसविणारे ।६।
आजोबांची शिस्त जशी
सैन्यातील फौजीसमान वाटते
आठवणींनी तुमच्या
डोळ्यांत अश्रू दाटते।७।
आजोबा तुम्ही का असे
दूर निघून गेले,
साऱ्यांना आवडणारे तुम्ही कसे सोडून गेले।८।
चरणी विणवणी करील
मी देवाला,
सदैव सुखी ठेवशील रे
माझ्या आजोबाला।९।
आजोबा पुन्हा मला भेटायला
स्वप्नात यालं का?
तुमच्या लाडक्या ‘सखू’ला
गोड पापा द्याल का?……..।१०।
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन
वयाचे तुम्हाला नाही बंधन
शिखर सर करता तुम्ही पटपट
शरीर आपले आहे पिळदारलाजेल बघून तुम्हाला महाबलवान
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन
छोट्या गोष्टीची घेता आपण काळजी
म्हणूनच संपूर्ण कुटुंब असते स्वच्छंदी
स्वच्छतेचा तुम्हाला मिळाला आहे वर
झाडून टाकता सगळे घरतुमचे कार्य बघून उर येतो आमचा भरून
म्हणूनच म्हणतो आम्ही सारे
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन
माझा आजां
माझा आजां लयं रुबाबदार होता…
त्याच्या असण्याचा साऱ्या घरावर दरारा होता…
त्याच्या बोलण्यातचं सारा गाव सामावला होता…
साऱ्या गावाच्या मदतीला धावणारा माझा एकमेव आजां होता…
बोलण्यात त्याच्या अजबच तोरा होता…
स्वत: आनंदी राहण्याचा त्याचा एकमेव ठेका होता…
माझा आजां लयं रुबाबदार होता…
पण काय कुणास ठाऊक त्याला मुलीच्या जन्माचा फार राग होता…
वंशासाठी दिव्याच्या हट्टाला तो पेटला होता…
अखेरच्या श्वासाला पण का कुणास ठाऊक त्याला मुलीचाचं आधार वाटला…
त्याच्या जाण्याने अखेरचा हातातून हात सुटला…
पणं, माझा आजां लयं रुबाबदार होता…
त्याच्या असण्याचा साऱ्या घरावर दरारा होता…
– कोमल जगताप

सफेद सदरा त्याचा सफेद आहेत केस
असा आहे माझ्या आजोबांचा वेषथोडी मिर्ची आहेत थोडे गोड
कधी कधी करतात माझी थोडी खोडएकदम चविष्ट जेवणाचे ताट
“लगेच या आजोबा मी मारतोय हाक!”अजून मजबूत आहे त्यांचे हाड
आम्हा नातवंडांचे करतात खूप लाडअसे आहेत माझे लाडके आजोबा
नातवाचा पहिला मित्र
आईवडिलांचा जीव की प्राण
प्रेम व्यक्त न करताही ह्रदयात प्रेमाची खाण
#आजोबा#
।।आयुष्य कस जगावं अणि जगु द्याव हे तुम्ही शिकवला
माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी
हे तुमच्याकडून कळाल..।।इवल्याश्या या बोटाना
तुम्ही दिला आधार
सोडून गेला तुम्ही
झालो मी निराधार
टाकले मी जेंव्हा पाऊल पहिले
होता तुम्ही बरोबर
आता आला आहे धीर
पण तुम्ही सोडून गेला खरोखर….लहानपणापासुन तुमच्या
अंगा खांद्यावर खेळलो
बाबा मारायला आल्यानंतर
तुमच्या कुशीत दडलो
तुम्ही मला चुकवुन कोल्हापुरात गेला
तर खुप वाईट वाटायचा
पण खायला घेउन आल्यानंतर
भानच हरपून जायचा….अजुनही मला आठंवतय
एक रुपयासाठी तुमचे पाय चेपुन द्यायचो
मिलालेल्या पैश्याचा गारेगार खायचो
रोज़ सकाळी उठल्यावर तुमच्या कड़े जायचो
निरागस चेहरा करून बिस्कीटचा पूडा मागयाचो
गरमगरम कांदा भजी तुम्ही
माझ्यासाठी घेउन यायचा
बेत असायचा माझा सगळा
एकट्यानेच संपवायचा……खुप सुंदर होत्या त्या आठवणी
खुप मोहक होते ते क्षण
तुमची सोबत असताना
कायमच हरवायाचे मन
तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून
मला चालायच आहे
तुम्ही दिलेल्या शिकवणीतुनच
मला शिकायचा आहे
आणि सगळयांना सांभाळता सांभाळता
हे जग सुद्धा जिंकायचे आहे…कारण
।।आयुष्य कस जगावं अणि जगु द्याव हे तुम्ही शिकवला
माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी
हे तुमच्याकडून कळाल..।।शुभम (kolhapur)-
[email protected]

नातवंडाबरोबर बालपणात रमून जाई
त्यांना शेवटचा मित्र बनवून घेई
जरी न लाभता सहवास जास्त
जीव मात्र एकमेकांमध्ये अडकून राही
आ- आयुष्यभर कष्ट करुन मुलांचे आणि नातवंडाचे संगोपन करते
जो -जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सगळ्यांना बांधून ठेवतो.
बा- बालपण हे म्हातारपणाचं दुसरं रुप असतं. जे नातवंडाना खेळवण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जातं
आजोबा आजी जीवनाचा आधार
कधीही करु नका त्यांचा अवमान
त्यांच्या येण्याने मिळेल प्रेम आणि माया
त्यांना तुम्ही नेहमी जपा
सफेद सदरा, सफेद फेस
असा आहे त्यांचा वेष
थोडी मिरची थोडी गोड
कधी कधी करतात थोडी खोड
एकदम परफेक्ट जेवणाचं ताट
लगेच मी मारतोय हाक
अजूनही मजबूत आहेत
करतात आमचे लाड
असे आहेत आमचे आजोबा
आजोबांसोबत असते एक गोड नाते
कधीही न विरणारे असे प्रेमळ नाते
आजोबा असतात कुटुंबाचा आधार
कायम देतात जगण्याला आधार
आजोबा तुम्ही आहात आमचा सर्वस्वी आधार

कमी बोलतात तरी, काळजी घेतात आमची
वय झाले तरी जबाबदाऱ्या पार पाडतात सारी
आजोब नावाचे आहे हे अनोखे रसायन
जे कधीच थकत नाही आणि थांबत नाही
कुुटुंबावर येता आच उभे ठाकतात समोरी
त्यांना नसते मोह-माया हवी असते प्रेमाची माया खरी
आजोबा तुम्ही नसता तेव्हा अस्वस्थ होतं माझं मन
तुमच्या काठीचा आवाज येता मनावरचे जाते दडपण
आजोबा तुम्ही नसता तेव्हा आयुष्य वाटते अपुरे
तुमच्या येण्याने जीवनात येतात आनंदाचे झरे
आजोबा तुमचे कठोर शब्द देतात आम्हाला प्रेरणा
तुमच्या असण्याने मिळते आयुष्याला नवी दिशा
देवा आजोबांपासून मला कधी वेगळे करु नकोस
कारण त्यांच्याशिवाय माझ्या आयु्ष्याला नसेल कोणतेही वळण
आजोबा तुम्ही आपल्या घराचा कणखर कणा
झाकून टाकतात आम्हा नातवंडांचा आगाऊपणा 👌
आहेत हट्टी इतके की त्याना वृद्ध बाळच म्हणा
आजोबा म्हणजे म्हातारपणातून आलेला लहानपणा🫂आजोबा आहेत खजीना आम्हा नातवंडांचा 😊
गोष्टींचा आठवणींचा आणि खोडकर म्हणींचा
मुलांपेक्षा जास्त लाड आम्हा नातवंडांचा👥आमच्या यशाची आजोबांना सदा वाटते कमाल 😇
त्यात खूप आहेत कष्ट जे त्यांनी घेतले काल
आई बाबांपासून वाचवणारी एकमेव ढाल🛡️
असे माझे आजोबा आहेत खूप छान 💝😍
मित्रांनो जर तुम्ही असल्या काही उत्कृष्ट रचना बनवत असाल जसे की आजोबा Quotes in marathi,Ajoba kavita,भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा quotes, आजोबा Quotes,Poem on grandfather in marathi,Ajoba status in marathi for whatsapp,आजोबांवर शायरी [Ajoba shayari marathi] तर आम्हाला पाठऊ शकता आम्ही त्या आमच्या या पोस्ट मध्ये तुमच्या नावा सहित पोस्ट करू.
मराठी चारोळी वर तुमच्या कविता, quotes, शायरी, घोषवाक्य किंवा तुम्ही तुमच्या गोष्टी देखील पथू शकता हे पाठवण्यासाठी तुम्ही आम्हाला [email protected] वर पाठवू शकता. जर तुमच्या मेल ला उत्तर देण्यास आम्हाला वेळ लागला तर कृपया आम्हाला क्षमा करावा.
आजोबा आणि नातू status
Ajoba quotes in marathi
Miss you ajoba quotes in marathi
Grandfather Quotes in marathi
पुण्यस्मरण चारोळी,आजी आजोबा कविता,आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
पुण्यस्मरण चारोळी