Best Farewell poem in marathi | निरोपसमारंभ

नमस्कार मित्रांनो, आज आपन पाहणार आहोत की निरोप समारंभ चारोळी आणि कविता ज्या तुम्हाला खूप आवडतील तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना पाठऊ शकता.निरोप घेण हे कधीही भाऊक करणार असत कधी कधी तर रडू पण येत. जुन्या आठवणी ताज्या होतात घडलेला प्रतेक क्षण किती चांगला होता हे वाटू लागत.

निरोप घेताना फक्त आपण घेऊन जातो ते म्हणजे आठवणी आणि मनोरंजक असे किस्से. जेव्हा निरोप समारंभाला आपण पुढे बोलायला जातो तेव्हा काय बोलव ते कळत नाही म्हणूनच मी काही कविता आणि चारोळ्या घेऊन आलोय त्या तुम्ही पाठ करून तिथे बोलू शकता.

 निरोप तुझा घेताना 

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मन लोचनी

निरोप तुझा घेताना बघते मागे वळुनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरूनी

निरोप तुझा घेताना मिटते मी पापणी
अंधार ही येई तेव्हा चेहेरा तुझाच घेऊनी

निरोप तुझा घेताना पाऊस गातो गाणे
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाते 

Farewell poem in marathi

पुन्हा पुन्हा मिळण्याची संधी मिळू दे,

सोबतीने घालवलेला प्रत्येक क्षण

पुन्हा नव्याने जगता येऊ दे,

जेव्हा पण माझ्या आठवणीने डोळे

बंद करशील तू.

स्वप्नात तुझी माझी भेट घडू दे.

दिवसामागून दिवस सरले

अनेक वर्षे सहज सरले
दिवस उजाडला निरोपाचा

आता सारे काही आठवणीतच उरले

बांधूनी घेऊ जगलेले

क्षण सारे गोड मनाशी

गाठू सारे उत्तुंग यश शिखरे

झेप घेऊनी आशी

-विवेक र. उरकुडे

बॅक बेंचर मी आणि कॉलेजची टॉपर तू

म्हणूनच सगळे जळतात तुझी

माझी मैत्री पाहून,

तुला भविष्यात कमावायचं आहे

नाव आणि मला हवीस तू,

तु सोडून जाणार या विचारानेच

डोळे आले भरून…

“FAREWELL म्हणजे आयुष्याचा शेवट नाही,

आपण कोणाशिवाय किती दृढपणे जगतो,

याची FIRST STEP आहे.

मित्रांनो तुम्हाला या कविता कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा म्हणजे आम्हाला असच काम करायला प्रोत्साहन मिळेल. मित्रानो जर तुम्हाला अश्या काही कविता लिहायला आवडत असेल आणि तुम्ही त्या कविता आम्हाला पाठाऊ इच्छित असाल तर आम्हाला तुम्ही ईमेल द्वारे पाठाऊ शकता.

आमचा ईमेल marathicharoli.in@gmail.com असा आहे. तुम्ही निसनकोच पणे आम्हाला पाठाऊ शकता.

Leave a comment