मित्रा वर कविता – ADITYA SHAM ZINAGE

मित्र म्हणजे एक जिव्हाळा हृदयातला..
प्रत्येकच्या मनात जपणारा..
मित्र म्हणजे एक श्वास..
जगण्याच सामर्थ्य देणारा..


मित्र म्हणजे एक आधार,
वळणावळणावर जिवनाच्या
चढउतारात सोबत देणारा.
खळखळून हसताना हास्यात सामावणारा,
भरभरून रडताना अलगद सावरणारा..
तो असतो एक दीपस्तंभ
अंधारात वाट दाखवणारा,
चुकलेले पाऊल मागे फिरवणारा..
तोल जाताना हात पुढे करणारा..


मित्र म्हणजे एक परिस..
लोहाच सोन करणारा.
एकाकी जीवनात
आपल्यासाठी आतुर होणारा,
शिशिरानंतर वसंत आणणारा..
तो म्हणजे एक आश्वासन
खऱ्या प्रेमाच, आपुलकीच..
मित्र होतो एक अफाट सागर..
त्याच्या पुढे आपल अस्तित्व
एका लहानशा झऱ्याप्रमाणे भासाव.


काय जादु असते अश्या मित्रांच्या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास………


– ADITYA SHAM ZINAGE

Leave a comment