बहुजन मित्रांसाठी एक कविता

Posted on

💙बहुजन मित्रांसाठी एक कविता💙बहुजनांवर प्रतेक वेळी होत असलेले अत्याचार आणि बहुजन लोकानी कस वागल पाहिजे या वर एक सापडली ती सर्व लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न…

 बहुजन मित्रा…!! बुवा महाराजांचे जोडे मखमली पालखीतून 

येऊन मिरवणाऱ्या बहुजन मित्रा,

मातीच्या मुर्तीसाठी चांदीचे देव्हारे 

सजवणाऱ्या बहुजन मित्रा, दगडांच्या देवळांसाठी सोन्याच्या कळसाचे 

नवस कबुल करणाऱ्या बहुजन मित्रा,

 एखादे वेळी त्या चैत्यभूमीवरही जावून ये ,

गेलास तेथे राहन, तर अभिवादन एकदा करून ये ,

बाबांच्या प्रतिमेला जाणीव पूर्वक स्मरून घे…!मित्रा,

 देवळाला सोन्याचा कळस देवू करण्याची तुझी स्थिती, 

मोटारीत बसुन देवळापर्यंत येण्याची तुझी परिस्थिती, 

अरे ! चक्क माणसांच्या रांगेत उभे राहण्याची 

तुझी पत तयार कशी झाली. ? 

याचा मागोवा जरा घेऊन ये…!

दगडाच्या देवळासाठी सोन्याच्या कळसाचे नवस कबुल

करणाऱ्या बहुजन मित्रा, 

एकदा त्या चैत्यभूमीवरही जाऊन ये…!
अरे,

तुझं ही घर होत वेशीबाटेर

तुलाही नव्हता प्रवेश देवळात

तुलाही बंद होते दरवाजे शिक्षणाचे 

तुझाही पाणवठा होता वेगळा

तुही चालत होतास मान खाली घालून 

माणसांच्या समोरून आज, मान वर करून 

चालण्याचे बळ कोठून आल याचा शोध 

जरा घेऊन ये…! दगडाच्या देवळासाठी

सोन्याच्या कळसाचे नवस कबुल

करणाऱ्या बहुजन मित्रा,

कदा त्या चैत्यभूमीवरही जाऊन ये…!
दोस्ता, 

तुझी आरी, तुझं चामड अस्पृश्यच होत,

तुझं रहाट, तुझे चव्हाट अस्पृश्यच होत, 

तुझ्या घोंगड्यातही टोचायचे मागासपनाचे काटे,

तुझ्या फुलांनाही नव्हते शुद्धतेचे मोल,

तुझी मडकी गाडगी होती मातीमोन,

तुझ्या वस्तऱ्याला होता हलकेपणातलाचा भाव,

आज,हे वधारलेने भाव कोठून आले ?

याच्या तपशीलात जरा जाऊन ये…!

दगडाच्या देवळासाठी सोन्याच्या

 कळसाचे नक्स कबुल

करणाच्या बहुतन मित्रा,

एकदा त्या चैत्यभूमीवरही जाऊन ये…!

Leave a Reply