Marathi Romantic Poems for Husband | नवऱ्यासाठी कविता 2023

Posted on

नमस्कार आज आपण पाहणार आहोत Romantic Poems for Husband.नवऱ्याला खुश करण्यासाठी काही खास अश्या कविता ज्या तुम्ही नवऱ्याला ऐकाऊं शकता आणि त्याला नक्की आवडतील याची खात्री मी देतो. तुमच प्रेम व्यक्त करण्यासाठी कविता हा एकदम बेस्ट पर्याय आहे.

कविता आपल्या मनातले भाव सहज पणे बोलून टाकतात. काहींना या कविता त्यांच्या नवऱ्याला खुश करण्यासाठी किंवा ऐकवण्यासाठी हव्या असतात तर काहीना नवऱ्यासाठी स्टेटस म्हणून ठेवायच्या असतात तर काही Poems for Husbands birthday म्हणजेच नवऱ्याच्या वाढदिवसाला हव्या असतात तर काहीना Poem on Husband for post caption marathi म्हणजेच नवऱ्याबरोबरच्या फोटो वर caption म्हणून हव्या असतात.

सध्या तर मला काही मोजक्याच कविता सापडल्या आहेत पण आम्ही लवकरच यात भर घालू तुम्ही पन आम्हाला या कामात मदत करू शकता तुमच्या बनवलेल्या कविता पाठवून. तुम्ही आम्हाला तुमच्या कविता Instagram वर पाठऊ शकता तसेच comment किंवा ईमेल द्वारे पण पाठऊ शकता

झूळझुळ वाहे वारा
मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश
त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली
जोडी आशी झकास.👌

वेचते मी क्षण
मिळतात श्वास तुझ्यातले
करावा दूर आसव दुराव्याचा
जोडून भाव मनातले.

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….

त्या प्रेमाच्या गावात
दोघेही जाऊ
प्रेम करताना दोघे
प्रीत नव्याने लिहू…

तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया….

प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक
क्षणी तुलाच मी पाहिलं
हृदयरुपी पुष्प माझं
तुलाच फक्त मी वाहिलंय.

घेऊत मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय
आता तूच समजावं याला.

विश्वास नात्याचा आधार असावा
तिथं नसावा शंकेला किंचितही थारा….
अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा
येता अविश्वासाचं वादळं….
तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं ..

एकांतातले माझे मधूर गाणे

मी गुणगुणत असते सदा… 

माझ्या या गुणगुण गाण्याला 

तुच तार छेडीतो सदा… 

नवऱ्यासाठी मराठी कविता

मला कापले पण तुझ्या डोळ्यात पाणी कसे रे…!!! 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

दोन जीव वेगवेगळे पण काळीज कसे एक झाले…!!! 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

आठवणीची साठवण माझ्या मनी,

तुझ्याच येण्याने खुलते माझ्या गालावरी खळी…!!! 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

माझ्या या भावना मी शब्दांनी का तोलते…??? 

तुझे मुके बोल कळू दे रे मला… 

सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 

जोडीदार आयुष्याचा तु माझ्या 

जगण्याला माझ्या देतोस तु नवी दिशा… 

साथ सोबत असतो माझ्या तु सदा

तुझीच साथ पल्लवित करते नवीन आशा… 

आयुष्य माझे सारे तुझ्या सोबतचं असावे

प्रत्येक संकटाला तुझा हात माझ्या हाती असावा.. 

भिडण्या मग सदा या नव्या जगाला

भय आता कसे वाटेल या जीवाला… 

Leave a Reply