सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश | Condolence sms for Armyman 2023

Posted on
सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश

मित्रांनो आपण ज्यांच्या भरोश्या वर निवांत झोपतो अश्या जवानांना विसरून चालणार नाही. प्रतेक दिवशी भारतातला एक तरी जवान शहीद होत असतो अश्या आपल्या शूर जवानांना वीर मरण प्राप्त होते आपण त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली पाहिजे.

आम्ही खाली काही संदेश दिले आहेत तसे ते खूप कमीच आहेत पण मित्रांनो आम्ही अजून यात जोडण्याचा प्रयत्न करू तसेच मित्रांनो जर तुम्ही आम्हाला काही असे संदेश कविता पठाऊ इच्छित असाल तर तुम्ही आम्हाला पाठऊ शकता तुम्ही आम्हाला कमेन्ट मध्ये किंवा आम्हाला instagram वर देखील पाठऊ शकता

पवित्र स्मृतींची ज्योत तेवते, अखंड आमच्या मनी,
सुगंध तुमच्या आदर्शाचा दरवळतो जीवनी आठवुनी
अस्तित्व, दिव्य, तव वृत्ती भारावली कृतज्ञतेने आम्ही
अर्पितो विनम्र श्रद्धांजली.

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांति देवो
आणि तुमच्या परिवारास या
संकटातून सावरण्याचे धैर्य मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली

ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भाव सुमनांची ओंजळ भरुनी
वाहतो आम्ही श्रद्धांजली

शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी
भावपूर्ण श्रद्धांजली

डोंगराच्या मागे गेलेला सूर्य
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण ढंगाच्या पलीकडे गेलेला
आपला माणूस पुन्हा कधीही
दिसत नाही देव तुमच्या आत्म्यास
चिरशांती देवो..
भावपुर्ण श्रध्दांजली

Leave a Reply