[Women’s Day 2024] जागतिक महिला दिन शुभेच्छा संदेश in मराठी

8 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांना त्यांच्या कामाबद्दल प्रोसाहित केल जात. आजकाल महिला कोणत्या क्षेत्रात नाही अस नाही. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत.

त्या प्रतेक क्षेत्रात पुढे आहेत.तरी देखील काही भागात अजून देखील त्यांना कमी लेखले जाते आपल्या पुरुष प्रधान प्रणाली मुळे स्त्रियांना कमी लेखले जाते आणि त्यांच्या बरोबर तुच्छ वागणूक केली जाते, हे आता आपल्याला बदलायला हव

फक्त महिला दिवस साजरे करून काही होणार नाही आपल्याला आवाज उठवला पाहिजे.

मित्रानो यासाठी मी आज काही (quotes)सुविचार, शुभेच्छा संदेश, कविता घेऊन आलोय ज्या तुम्ही पोस्ट करून महिलाना पुढे जाण्यास मानसिक रित्या प्रोत्साहन देऊ शकता.

womans day wishes in marathi

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विधात्याने घडवली सृजनांची सावली, निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी. महिला दिनाच्या शुभेच्छा.

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा, म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू. एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

international women’s day wishes in marathi

जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा

स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता, प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता. महिला दिनाच्या शुभेच्छा.

happy women’s day wishes in marathi

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.

विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

महिला दिनानिमित्त काही कविता

मित्रांनो आता आपण काही कविता पाहू जर या कविता तुम्हाला आवडल्या तर आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला देखील अश्या कविता लिहायच्या असतील तर आम्हाला नक्की कळवा.

आज जागतिक महिला दिनानिमित्त

सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,

विविध पातळीवर यशाची

उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,

शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या

कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”

“नारी हीच शक्ती आहे नराची…

नारीच हीच शोभा आहे घराची…

तिला द्या आदर, प्रेम, माया…

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे”

Happy womens day quotes in Marathi 

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..

आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..

ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..

आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..

“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

बायकोसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश

तुमच्या बायकोला महिला दिनी शुभेच्छा देऊन त्यांना पुढे जाण्यास मदत करा आणि त्यांना तुमचे प्रेम व्यक्त करा किवा त्यांना मस्त अशी भेट वस्तु गिफ्ट करा.

Mahila dinachya marathi shubhechha

ज्याच्यासोबत तुझ्यासारखी निर्मळ पत्नी आहे त्याला कशाची काय भ्रांत…तू माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

बायको ही प्रेयसी, सहचारिणी, मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावत असते. म्हणूनच तिला या खास दिवशी एखादा खास मेसेज पाठवायलाच हवा.

प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.

ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Womens Day Status In Marathi

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा

यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते हे तुझ्याकडे पाहून मला समजले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Womens Day SMS In Marathi

पत्नी घराचा स्वर्ग अथवा नर्क दोन्ही करू शकते. तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Womens Day Thoughts In Marathi

तुझ्या कतृत्त्वाचा डोंगर पाहून इतरांना हेवा वाटतो तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते. तू अशीच यशस्वी हो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जबाबदारीसह घेते भरारी, न थके ना तक्रार करी.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सुखदुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा

आईसाठी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई अशी व्यक्ति जी आपल्याला सर्वांपेक्षा 9 महीने जास्त ओळखत असते तिला महिला दिन दिवशी विश करून तुमचे प्रेम व्यक्त करा.

आई तुझ्या मायेला पार नाही तू जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री कितीही भित्री असली तरी जेव्हा प्रश्न तिच्या पिलांचा असतो तेव्हा ती वाघीण होते. म्हणूनच आई ही मुलांसाठी सर्वस्व असते. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आई काय करते पेक्षा आई काय काय नाही करत हा प्रश्न मला पडतो आणि आईच्या संस्कारांची जाणिव होते. आई तुझे किती उपकार मानू… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

मला जन्म देणाऱ्या आणि या सृष्टीला जन्म देणाऱ्या अनंत मातांना माझा शाष्टांग नमस्कार… जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा

आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

आई तू मला जन्म दिलास पण त्याचवेळी तुझाही दुसरा जन्म झाला. तुझ्या या उपकारांचे पांग कसे आणि कधी फेडू… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

माझ्यावर तुझे प्रेम अनंत, तुझ्या प्रेमाला नाही सीमा, तुझ्या कतृत्व आणि मातृत्वाला कुठलीच नाही सीमा. आई महिला दिनाच्या शुभेच्छा

आई नसेल तर मुलं पोरकी होतात पण खूप कमी लोकांना माहीत असेल अशा पोरक्या झालेल्या बाळांवरही आई सुक्ष्म स्वरूपात कृपेची बरसात करतच असते.

ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई

ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आई ही व्यक्तीच अशी आहे तिच्यामुळे या जगात आपला जन्म होतो. आईची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही खूपच छान संधी आहे.

महिला दिनासाठी काही (Quotes)सुविचार

आता आपण पाहू काही थोर लोकांचे विचार..!

जी महिला आदर्श स्त्री असते ती आदर्श पत्नी होऊ शकते, महिलांच्या हातात लक्ष्मी नांदते – प्रेमचंद

घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रूपाने लक्ष्मीच सोन्याच्या पावलांने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते – सदगुरू श्री वामनराव पै

संशय हा एक खूप मोठा शत्रू आहे. आपण कोण आहोत आहेत आपला जन्म कशासाठी आहे हे माहीत असणं गरजेचं आहे  – जेनिफर लोपेझ

जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते  – ब्रिघम यंग

तुम्हाला तुमच्या शत्रुंसमोर उभं राहण्यासाठी फार धैर्याची गरज असते. मात्र त्याहून जास्त संयम लागतो तुमच्या प्रियजनांसोबत उभं राहण्यासाठी – जे. के. रोलिंग

कृतीविना दृष्टीकोन हे केवळ स्वप्न आहे आणि दृष्टीकोनविना कृती करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. म्हणूनच कृतीला दृष्टीकोनाची जोड द्या तुमचे जग बदलू शकेल – सुधा मुर्ती

स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे – भगवतीचरण वर्मा

महिलांना अबला म्हणणं हा त्यांचा अपमान आहे- महात्मा गांधी

महिला नेहमीच विजयी राहतील – महादेवी वर्मा

Leave a Comment

Scroll to Top