+23 श्रावनाच्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

 

 

 
 

 

 श्रावनाच्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…!

 

             चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार.श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. 

हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. श्रावण महिना भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा विशेष फलदायी असते. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात.

 

 

 

 भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते.

‘श्रावणात घननिळा बरसला’ या ओळी आपोआपच श्रावण सुरू झाल्यावर ओठांवर गुणगुणाव्याशा वाटतात. मराठी महिना श्रावण हा आपल्याकडे अधिक प्रसिद्ध आहे तो सणांसाठी.

       

 

💠      ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |

                  उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्||

 

 

 

  🌼           निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून

                रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू

                  श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

 

🌺      येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून 

           सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून 

           श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

 

🌺  रंग रंगात रंगला श्रावण

   नभ नभात उतरला श्रावण

   पानापानात लपला श्रावण 

    फुलाफुलांत उमलला श्रावन

श्रावण महिन्याच्या तुम्हा 

  सर्वांना भरभरून शुभेच्छा!

 

 

 

    🌼      सणासुदीची घेऊन उधळण

               आला रे आला हसरा श्रावण!

 

 

 

    🌺       परंपरेचे करूया जतन 

          आला आहे श्रावण 

– श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  

 

 

 

 

💠  आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी 

            घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी 

              श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

 

 

 

 

  🌼       हासत – गात, घेऊन सरींची बरसात 

                आला तो मनमोहक माझा श्रावण महिना 

 

 

 

 

🌺    जरासा हासरा, जरासा लाजरा

              सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला 

              श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a comment