+101 बैलपोळा कविता,शुभेच्छा संदेश In Marathi

Posted on

बैलपोळा हा शेतकरी व शेती शी संबंधित सण आहे.भाद्रपद महिन्यातिल कृष्ण अमावस्या या दिवशी विशेष करून महाराष्ट्र , कर्नाटक व छत्तीसगढ या भागात हा सण साजरा केला जातो . बैलपोळा हा सण साजरा करण्या मागे एक जुनी म्हण आहे. ऑगस्ट महिन्यात शेतीची कामे पूर्ण होऊन याच दिवशी अन्नमाता गर्भ धारण करते आणि धान्याच्या रोपटयांत दूध भरायला सुरवात होते. म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी खास करून शेतकरी खूप आनंदी असतात. घरामध्ये एक उत्साहिक व आनंददायी वातावरण निर्माण होते.

हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रातली लोक पुरणपोळी व खीर यांचा नैवध्य म्हणून देवाला व बैलांना खाऊ घालतात व तसेच ते हि लोक आवडीने पुरणपोळी खातात बैलांना रंग देऊन व फुगे किंवा रंगिबेरंगि झुल वगैरे घालून सजवले जाते स्त्रिया बैलांचि पूजा करतात . तसेच मातीची छोटी बैले घेऊन कुंभार घरो घरी वाटतो व त्या बदल्यात धान्य गोळा करतो त्या बैलाचि सुद्धा पूजा केलि जाते बैलाच्या भोवती गोल गोल फिरत गाणी म्हंटली जातात या दिवशी बैल शर्यत यां सारख्या पारंपरिक शर्यती चे नियोजन गावो गावी केले जाते.  तसेच छत्तीसगढ मध्ये घरगुती पद्धतीने हा सण साजरा केला जातो.तेथील लोक या दिवशी पुरी,खीर,खुरमी, चौसेला, थेथारी यांसारखे पदार्थ आवडीने बनवतात.

अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी  वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

सर्वात पहल्यांदा सर्व बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश संग्रह

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

आता काही शुभेच्छा संदेश..

महाराष्ट्र बेंदूर स्टेटस

सण माझ्या सर्जा राजाचा,

 ऋण त्याचं माझ्या भाळी👨‍🌾, 

सण गावच्या मातीचा🙏,

 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🎉

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

कृषीप्रधान संस्कृतीमधला 

महत्त्वाचा उत्सव बैलपोळा, 

सर्व👨🏽‍🌾 शेतकरी बांधवांना

 हार्दिक शुभेच्छा.!!🍁🎊

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन,

 बळीराजा 👨‍🌾🙏संगे जो राबतो रात-दिन,

 सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,

 बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!💐

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

शिंगे घासली बाशिंगे लावली,🥳

माढूळी बांधली मोरकी आवळली. 

तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा🌺

वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.. बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!💐

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

जसे दिव्याविना वातीला,🍁

आणि वातीविना दिव्याला नाही🔥

पर्याय, तसेच कष्टाविना मातीला

आणि बैलाविना नाही👨🏽‍🌾

शेतीला पर्याय, बैल पोळा 

सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!💐

😊bail pola chya hardik shubhechha banner👨‍🌾 

आज बैलपोळा.. वर्षभर 👨🏽‍🌾बळीराजाच्या

खांद्याला खांदा लावून🌺 काबाडकष्ट 

करणाऱ्या इमानी अशा🍁 बैलांप्रती 

सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🎉

जगाचा पोशिंदा असलेल्या 🌺

👨‍🌾शेतकरी बांधवांना

 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

शेतात👨🏽‍🌾 राबणाऱ्या तुझ्या अंगाला, 

आज शांत निजू दे.🌃

 तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला🍀, 

तुझ्या डोळ्यात सजू दे.🎊

बैलपोळ्याच्या शुभेच्छा.!!🥳

दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,

🌺नको लावू फास बळीराजा

👨🏽‍🌾आपुल्या गळा, 👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🥳

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

आला आला रे बैल पोळा🎉 गाव झालं सारं गोळा,

 सर्जा 🔥राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, 

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🎊🥳

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

👨‍🌾कष्ट हवे मातीला….

चला जपुया पशुधनाला….👨🏽‍🌾

 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎉

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

कष्टाशिवाय मातीला आणि👨🏽‍🌾

 बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.

 हजारो🌺 वर्षापासून आपल्यासाठी 

राबणाऱ्या बैलाचा सण पोळा

सर्व शेतकरी बांधवांना🙏

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🥳🥳

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

आज पुंज रे बैलाले,👨🏽‍🌾 फेडा उपकाराचं देणं, 🥳

बैला खरा तुझा सण,🍁 शेतक-या तुझं रीन💐

 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!🥳

👨🏽‍🌾बैल पोळा कविता👨🏽‍🌾

वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।। 

किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।। 

तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भई ।। 

एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।

 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎉

आज पुंजलेरे बैलाले, फेड उपकाराचे देनं,

 बैला, खरा तुझा सण, 👨🏽‍🌾शेतकऱ्या तुझं रीनं, 

श्रावण बैलपोळा निमित्त 

सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

🌺🌺🌺🌺🥳

बळीराजाचा मित्र तू

त्यांच्या डोक्यावरचं छत्र

हरपू न देणारा तू…

शेतकऱ्यांचा राजा तू

सुखातल्या क्षणांचा

गाजावाजा करून देणारा तू…

शेतकरी राजांच्या मातीची

पायाभरणी करून पिक

उत्पादन मिळवून देणारा तू…

कॄषिप्रधान लोकांना

रुबाबदार ऐट मिळवून

देणारा सर्जा राजा तू…

तूझ्या शॄंगारासाठी नेहमी

शेतकरी राजा सज्ज असतो

असा हा सण बैल पोळा…

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

👨🏽‍🌾बैल पोळा स्टेटस👨🏽‍🌾

🙏🌺😊🌼

मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,

सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा.. 

आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा आणि खास सण. 

आपल्या शेतकऱ्यांचा सण. 

आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गळणार्या बैलाचा सण.

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

Prashant Tidke

🙏🌺😊🌼

तू रे वाहान शिवाच, कोणी म्हणे तूला नंदी,

तूझ्या असन्याने आहे दारी चैतन्याची नांदी.

तूझी कवड्याची माळ त्याला घुंगराचा नाद,

तूझ्या हंबराला आहे बळीराजा चा आवाज.

तूझी झूल नक्शिदार जस भरल शिवार,

तूझ्या शिंगांचा रूबाब जनु कनिस डौलदार.

पिंजलेला जिव सारा कुणब्याची घुसमट,

तुझ्या असन्यान धिर तूझ्या असन्यान थाट.

तूझ्या साथीला नमन तुझ्या श्रमाला नमन,

तूस्या सवे रान सार राहो सदा आबादान.

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

🙏🌺😊🌼

राबूनिया वर्षभर

करीतो एक दिवस आराम

माझ्या राजाचा सच्चा साथी

करीतो वंदना राजा आज त्याच्या दैवताची

🙏🌺😊🌼

पुन्हा ताजे झाले बालपण

तान्हा पोळ्याच्या आठवणीने..

साठवणीने नेले भूतकाळात

ताईने दिलेल्या सुंदर विषयाने..

सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला

घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी..

मागून त्याच्यासाठी दानापाणी

प्रस्थान मग असे शिवारावरी..

ठेवून दावणीच्या ठिकाणी

औक्षण सर्व जोडयाचे करायचो..

दाखवूनी नैवेद्य पुरणपोळीचा

मग सवंगडी सोबत खेळायचो..

असा हा आम्हा बालगोपाळाचा..

तान्हा पोळ्याचा खेळ रंगायचा..

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

🙏🌺😊🌼

आजीने घेतलेली एक मातीची बैलजोडी… तिला स्वतःच्या हाताने चिखलाची (काऊ माती) बैलगाडी ..काडीचे जु असा सरंजाम करून खेळ मांडला जायचा…सोबत गोड चकली असायचीच..😊

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

🙏🌺😊🌼

संपलो जरी मी तरीही

तू धिर मात्र सोडू नकोस,

उजळेल पुन्हा दिस नवा

तू जगणे मात्र सोडू नकोस…

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

🙏🌺😊🌼

आला आला पोळा बैलांना सजवा

गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा

वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग

सतत कष्टाचाच पाढा.!!

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

🙏🌺😊🌼

वावर वाडा सारी

बापाची पुण्याई

किती करू कौतुक तुझं

मीच त्यात गुंतून जाई

तुझ्या या कष्टाने फुलून

येते ही काळी आई

बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🎊

🙏🌺😊🌼

शेतकऱ्यांच्या मुकुंदा…

प्रपंच आमुचे उजाड अंगण,

तुझ्याच घामाने होते नंदनवन…

घे मनमुराद आज सजून,

भाजी भाकर गोड मानून,

होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,

बैल पोळ्याच्या तुलाही खूप खूप शुभेच्या.!!

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾🙏🎉

bail pola in Marathi SMS
bail pola festival in Marathi status
happy bail pola in Marathi status
happy bail pola in Marathi status download
bail pola Marathi status
bail pola Marathi status download
bail pola Marathi status download Mirchi
bail pola Marathi status video download

Leave a Reply