देवावर कविता || Poem on god in marathi

 

देव म्हंजे कोन,कुठं असतो या सारख्या प्रश्न सर्वांना पडतो.पण तो खर तर कुठं असतो या विषयी ऐक कविता सुचली ती पुढे दिली आहे.एकचि निर्माता..…

प्रेम उपासक । प्रेमची करतो ।
सज्जना मानतो ।  गुरुराया ।।
होणार फायदा । रागाने कोणता ।
वाईट बोलता । कशासाठी? ।।
कटू शब्द जरी । सत्य बोला मग ।
नत होतो जग । सत्यापुढे ।।
दैव नाही हाती । आहे कर्मामध्ये ।
सत्य धर्मामध्ये । मानवता ।।
माणूस बनून । रहा निरंतर ।
बनून ईश्वर । राहू नका ।।
एकचि निर्माता । एकचि मालक ।
जगाचा चालक । तोच आहे ।।
जिथे आहे प्रेम । जाणा तिथे देव ।
तोचि एकमेव । सर्वव्यापी ।।
नाम त्यांचे बहू । भक्तांनी दिधले ।
कर्मात पाहले । नित्य त्यांना ।।
अजु सत्यापाठी । देव उभा आहे ।
तोचि जना पाहे । काळजीने ।।
©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७


दगडात नाही, माणसात मी देव पाहिला

दगडात नाही, माणसात मी देव पाहिला

कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी जनतेसाठी

 त्यांचा वेळ वाहिला, त्यांच्यात भी देव पाहिला

दगडात नाही, माणसात मी देव पाहिलाभर उन्हात उभा राहूज, जो जनतेसाठी पांडुरंग झाला

त्यांच्यात मी देव पाहिला, त्यांच्यात मी देव पाहिला 

दगडात नाही, माणसात मी देव पाहिलास्वताचा जीव धोक्यात घालून

या मानवासाठी ज्या नर्स ताईनी सेवा दिली

त्या ताईमध्ये मी देव पाहिला

दगडात नाही, माणसात मी देव पाहिला डोळ्यात तेल घालून ने सीमेवर

आपल्या भारत मातेचे रक्षण करतात

त्या सैनिकांत मी देव पाहिला

दगडात नाही, माणसात मी देव पाहिलाअपघात प्रसंगी चटकन धाऊन येणाऱ्या, 

मदतीचा हात देणाऱ्या लोकांमध्ये मी देव पाहिला

दगडात नाही, माणसात मी देव पाहिला

 


माळीण, सांगलीचा पुर, केरळ पुर या

 नैसर्गिक आपत्तीत मदत करणाऱ्या संस्था, 

देणगीदार यांच्यात मी देव पाहिला

दगडात नाही, माणसात मी देव पाहिलाकोरोनाच्या काळात शिक्षक, सफाई कामगार व

इतरांनी जी सेवा बजावली, त्या सर्वामध्ये मी देव पाहिला

दगडात नाही, माणसात मी देव पाहिला. 

दगडात नाही मी त्यांच्या माणुसकीत देव पाहिला


-कु सिध्दी तानाजी जगताप

Leave a Comment

Scroll to Top