43+ लग्न पत्रिकेसाठी कविता | Wedding card poems in Marathi

Wedding card poems in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही लग्नपत्रिकेसाठी कविता ज्या तुम्ही आमंत्रण देताना कार्ड वर लिहू शकता. लग्न म्हंटल की हे सगळं आलंच हसण रडण रूसण काहींना लवकर सांगितल नाही म्हणून राग येतो तर काहीना पत्रिका मिळाली नाही म्हणून या साठीच आम्ही अश्या कविता घेऊन आलोय की ज्या वाचल्याने त्यांचा राग नक्कीच निघून जाईल मग तुम्ही पत्रिका उशिरा पाठवली तरी किंवा जरी तुम्ही पत्रिका द्यायला गेला नाही तरी.

लग्न हे जीवनात एकदाच होत असत म्हणून प्रतेकाला वाटत की हे खास असाव म्हणून या छोट्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात.

मी या साऱ्या कविता इंटरनेट वरुण शोधून खास आपल्या साठी आणल्या आहेत तरी या कविता तुम्हाला कश्या वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. जर का तुम्हाला पण अश्याच कविता आम्हाला पाठवायच्या असतील तर आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल द्वारे पाठऊ शकता.आमचा ईमेल [email protected] असा आहे.

नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय, कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्नीदेवतेच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आर्शवादाने आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहात आपले शुभार्शिवाद… आपणांस लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण

ऋणानूबंध ठाऊक नव्हते.. एकमेकांना शोधत होते, नाते तसे  जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले दोन मनांचे, असे हे बंध रेशमाचे, अथांग हा सागर संसाराचा, विवाह होतोय…. आणि  …. चा, आर्शीवाद असो मान्यवरांचा. आपले पणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीने आगमन तुमचे !!!

सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची, पृथ्वीतलांवर जोडी शोभे …. आणि … ची, ईश्वरानेच गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्मींची पुण्याई…. घराण्याची, सहपरिवार येऊन शोभा वाढवावी आपण मंगल कार्यांची…

जन्म दिला पित्याने, गाठ मारली ब्रम्हदेवाने, होईल आज विवाह अग्नीदेवाच्या साक्षीने, शुभ कार्य सिद्धीस जाईल श्री गणेशाच्या आर्शीवादाने. संसाराची  सुरूवात होईल सप्तपदीने, मंगलप्रसंगाची शोभा वाढू दे  तुमच्या येण्याने

सप्तपदींची सात पावले म्हणजे सात जन्मांच्या गाठी, यायलाच हवे तुम्हाला … आणि …. यांच्या विवाहासाठी,…

पाऊस क्षणाचा  पण  गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जन्माची, मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची, आपला सहभाग क्षणाचा पण आर्शीवाज आयुष्यभराचा… या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन वधू वरांना आर्शावाद द्यावे. 

प्रेमाला असते विश्वासाची साथ,

कळीला असते फुलण्याची वाट,

तसेच दोन जुळत्या मनाला असते

एकत्र जगण्याची आस म्हणून

____ परिवारात उपस्थित राहून बांधा

____ व ____ यांची जन्मठेपेची गाठ…!

पाऊस क्षणाचा, पण गारवा कायमचा…

मैत्री दोन जीवाची, मंगल सोहळा एक दिवसाचा…

भेट क्षणाची, पण आशिर्वाद महत्वाचा…

म्हणूनच आपले येणे महत्त्वाचे,

करिता आग्रहाचे निमंत्रण ____ परिवाराचे…!

आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान । म्हटले तर दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा ।।
म्हटले तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध । सात जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा ।।
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादाशिवाय अपूर्णच । म्हणूनच या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती हवीच

विश्वा दिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी केला संसार पंढरी, शिवरायांनी रोवला स्वराज्यांचा झेंडा, असा महाराष्ट्र  धर्म राडवेडा, याच मातीतील अभंग आणि ओव्या विवाहास येत आपण  ,…. आणि ….  यांच्यावर मंगल अक्षता पाडाव्या  

विवाह म्हणजे आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान,  दोन जीवांना जोडणारा एक नाजूक धागा, दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध, सात जन्मांच्या गाठी जुळवणारा हा सोहळा, आपल्या शुभेच्छा आणि आर्शीवादा शिवाय अपूर्ण… म्हणूनच आपणांस लग्नसोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण 

ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची, पृथ्वीतलावर जोडी शोभते xxx व xxx ची
पुर्व जन्माची पुण्याई xxx घराण्याची, कन्या देउनी वाढविली कीर्ती नावाची
पुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सून शोभते xxx घराण्याची
सगे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची
माथ्यावरती पडूद्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची

ऋणानुबंध ठाऊक नव्हते … एकमेकां शोधित होते । नाते तसे जुनेच होते !
आगमन झाले शुभयोगाचे … नाते जुळते दोन मनांचे । असे हे बंध रेशमाचे !
अथांग हा सागर संसाराचा … विवाह होतोय xxx आणि xxx चा । आशीर्वाद असो मान्यवरांचा !
आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे !!

सोनेरी पहाट, जन्माची गाठ,

(नवरदेव)च्या संसाराला

(नवरी)ची साथ,

दिवस आहे __वार मुहूर्त आहे खास,

(नवरदेव) आणि (नवरी)च्या डोक्यावर

ठेवा आशीर्वादाचा हात…… !

हिमालयातून निघाली गंगा,गंगेचे निर्मळ पाणी,आठवण येते क्षणोक्षणी,पंख नाही दिले देवानी,म्हणून निमंत्रण पाठवत आहे पत्रिकेनी,होतील कश्ट तरी सहन करून यावे लग्नाला,चुकून सांगू नका पत्रिका नव्हती आम्हाला

लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे एक नवा अनुबंध

विवाह, सुख दुःखातील आजन्म सोबत, सुरांची साथ, हवीहवीशी संगत

विवाह ! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं एक जाणीव
एक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचं
एक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन
सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण
यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं

XXXX आणि XXXX ची जमली आता जोडी
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा या दिवसाची गोडी

अक्षधांची उधळण, मांगल्याचा क्षण,

दोन घराण्याचा संगम, संसार ससीतेचा उगम,

दोन परिवाराचे मंगलमय मिलन,

आपण सहपरिवार लग्नाला यावे हेच

___ परिवाराचे आग्रहाचे निमंत्रण…

विवाह म्हणजे आजन्म साथ,  आनंद आणि सुखाची  बरसात, …. आणि…. यांची जमली जोडी…. आपण येऊन त्यात घालावी आर्शीवादाची साथ 

लग्न म्हणजे जुळलेले बंध । लग्न म्हणजे नवे अनुबंध ।।

लक्ष्मीच्या पावलांनी मेहंदीच्या हाताने,

कुलदेवतेच्या साक्षिने, सप्तपदीच्या पवित्र बंधनाने,

गृहास्थाश्रमात पदार्पण करणाऱ्या

नव दांपत्यास शुभाशिर्वाद देण्यासाठी

……….. परिवाराचे आगत्याचे निमंत्रण.

एक क्षण… पहिला प्रहर, एक क्षण… मेंदीचा बहर,

एक क्षण… लगीन घाई, एक क्षण… वाजे सनई,

एक क्षण… अंतरपाठ, एक क्षण… रेशीम गाठ,

मुहूर्ताचा हा क्षण जणू काही एक सण…

प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।।

ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।।

सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।।

वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।

दोन जीवांच्या स्वप्नाची परिपूर्ती करणाऱ्या

या पवित्र संस्कार सोहळ्यास

आपण सहपरिवार उपस्थित राहून

आशिर्वाद द्यावेत ही आग्रहाची विनंती.

दोन पाखरांची भेट निळ्या उंच आभाळी । स्वप्न मनातले त्यांच्या एक घरटं बांधुनी ।।
नव्या पर्वाची, अशी सुरवात दोघांची । ईश्वरचरणी नमन करुनिया ।।
एक सोहळा मोलाचा अन मोलाचं हे नातं । जणू नक्षत्रांचं देणं ह्या प्रिय धर्तीला ।।
चिमणा-चिमणीचा इथं थाटतो संसार । मन भरुनी तुमचे, यांस लाभू द्या आशिर्वाद ।।

मुर्तिविना मंदिर सूने,पंखावीणा पाखरू,तुम्हावीणा मंडप सूने,येण्यास नका विसरु काय,चमत्कार कोण कोणाजवळ येतो,तिथे ज्यांचे भाग्य असते,तिथेच त्यांचा विवाह होतो.

सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची ।
पृथ्वीतलावर जोडी शोभे xxxx – xxxx यांची ।
ईश्वराने गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्माची पुण्याई xxxx – xxxx घराण्याची ।
सहपरिवारासह येऊन शोभा वाढवावी मंडपाची, वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावा हिच विनंती ।।

सप्तपदींची सात पावलं साताजन्माच्या गाठी
यायलाच हवं तुम्हाला xxxx – xxxx साठी
xxxx कन्या xxxx ची तीन भावंडांत मोठी
xxxx ही घरात मोठा आमची म्हातारपणाची काठी

वेल बहरली प्रितीची, फुले लागली प्रेमाची |

दोन जीवांचे मिलन झाले, जुळती नाती दोन घरांची ||

ही कृपा श्री गणेशाची, कृपा करावी येण्याची |

पडावे तुमचे पवित्र पाऊल लग्न मंडपी,

ही विनंती ____ परिवाराची….

सप्तपदीची सात पावलं,गुंफल्या नात्याच्या गाठीयायलाच हवंय तुम्हाला,वधू- वरास आशीर्वाद देण्यासाठी,हीच विनंती आपणास____ परिवाराची….!

विश्वा दिली ज्ञानेश्वरी । तुकोबांनी केला संसार पांढरी ।
शिवरायांनी रोवला स्वराज्याचा झेंडा । असा महाराष्ट्र धर्म राजवेडा ।
याच मातीतील अभंग नाती-गोती । XXXX आणि XXXX परिवाराकरिता आपल्या अक्षदा पाडाव्यात

शांत चंद्राची अपार माया जगावरी,थोर नी यावे शुभविवाह प्रसंगी,आमच्या येथे कुटुंबसहीत तसेच ,इश्टमित्र परिवारासह येऊन,वधू वरास शुभा शिर्वाद द्यावा,ही विनंती ____ परिवाराची.

पाण्यात शोभा कमळाची,आकाशाला शोभा चांदण्याची,मंडपाला शोभा पाहुण्याची,गाठ सात जन्माची,बाग बहरली सात जन्माची,लग्नाला यावे आशीर्वाद देण्यासाठी,हीच विनंती ____ परिवाराची.

एका नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय
कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्निदेवतांच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आशीर्वादाने
आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहेत आपले शुभाशिर्वाद
आपण सर्वांनी यावं हे आग्रहाचे आमंत्रण !

Leave a comment